बेळगाव : आबा व हिंद क्लब आयोजित दुसऱ्या पीव्हीआर निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व अॅक्वेरियस क्लबने 49 सुवर्ण, 47 रौप्य व 39 कांस्य असे एकूण 135 पदकांची लयलुट करुन घवघवीत यश संपादन केले आहे. गोवावेस येथील मनपा रोटरी क्लब जलतरण तलावात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत स्वीमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यात सुनिधी हालकारेने 7 सुवर्ण, 2 रौप्य, निधी कुलकर्णीने 6 सुवर्ण, 2 रौप्य, समृध्दी हालकारेने 5 सुवर्ण, 3 रौप्य, सार्थक श्रेयेकरने 5 सुवर्ण, 3 कांस्य, भगतसिंग गावडेने 4 सुवर्ण 3 रौप्य, वेदांत मिसाळेने 3 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कांस्य, स्वरा कलखांबकरने 3 सुवर्ण, 2 कांस्य, द्राक्षा निट्टूरकरने 3 सुवर्ण, पाकी हलगेकरने 2 सुवर्ण, 3 रौप्य, समिक्षा घसारीने 2 सुवर्ण, 2 रौप्य, 4 कांस्य,
अहिका हलगेकरने 2 सुवर्ण, 3 रौप्य, तनिषा भाटीने 2 सुवर्ण, 5 रौप्य, तन्वी पै ने 2 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य, अर्श चव्हाणने 1 सुवर्ण, 2 रौप्य, रिचा पवारने 1 सुवर्ण, 1 रौप्य, 4 कांस्य, जिनू होंडाकट्टीने 1 सुवर्ण, 1 रौप्य, अभिनव देसाईने 5 रौप्य, 2 कांस्य, अनिष पै ने 3 रौप्य, 3 कांस्य, रित्वी नरसगौडाने 2 रौप्य, 1 कांस्य, यशराज पावशेने 1 रौप्य, 7 कांस्य, वंश बिर्जेने 1 रौप्य, विहान कोरेने रौप्य, अंश यल्लाजीने 3 कांस्य, राघव कडट्टी 2 कांस्य, स्कंद घाटगे 2 कांस्य, सिद्धांत कराडकर कांस्य, आयुष मुतगेकर कांस्य पदक पटकाविले. त्यात सुनिधी हालकारे, समृध्दी हालकारे, निधी कुलकर्णी, सार्थक श्रेयेकर, पाकी हलगेकर, भगतसिंग गावडे, स्वरा कलखांबकर, द्राक्षा निट्टूरकर यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर व विनायक आंबेवाडकर याचे मार्गदर्शन लाभत आहे.









