रिचा, समीक्षा , दर्शिका, जिनू यांना वैयक्तिक विजेतेपद
बेळगाव : महाराष्ट्र अॅमेचर असोसिएशन व सोशल सर्कल यांच्या संयुक्त विद्यमानाने निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमरर्स व एक्वेरियस जलतरण क्लबच्या जलतरणपटुनी 24 सुवर्ण,23 रौप्य, 27 कांस्यपदकसह 74 पदके पटकवीत घवघवीत यश संपादन केले आहे इचलकरंजीच्या शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे घेण्यात आलेल्या वीर सावरकर चषक जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत रिचा पवार, यशराज पावशे, समीक्षा घसारी, दर्शिका निटूरकर, जिनू ओंजड कट्टी यांनी आपापल्या गटात वैयक्तिक विजेते पटकाविले. या स्पर्धेत रिचा पवार ने 6 सुवर्ण, एक रौप्य, यशराज पावशेने 5 सुवर्ण, समीक्षा घसारीने 4 सुवर्ण 3 रौप्य, दर्शिका नीटूरकरने तीन सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य, साईशा पाटीलने 2 सुवर्ण,4 रौप्य , जिनू कट्टी 2 सुवर्ण, वैष्णवी 1 सुवर्ण, चार रौप्य, आराध्यने 1 सुवर्ण,1 रौप्य,2 कांस्य, वंशी बिरजेने 2 रौप्य, 2 कांस्य, अथर्व राजगोळकर 2 रौप्य,1 कांस्य, रितवीने 2 रौप्य , सायली घुगरटकर 1 रौप्य,5 कांस्य, संकेत होसमट 1 रौप्य,2 कांस्य, अद्विकाने 1 रौप्य ,1 कांस्य, राघवने 5 कांस्य, स्वराली शिवांगाकरने 2 कांस्य, स्वराने 2 कांस्य, अंश 2 कांस्य, हर्ष चव्हाण कांस्य पदक पटकावले. या सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी. अक्षय शिरेगार, अजिंक्य मंडके, नितीश कडूचकर गोवर्धन काकतीकर महेश पवार, आशिष कुरणकर, इमरान उचगावकर, विनायक आंबेवाडी कर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.









