8 बँकांशी चर्चा करणार : पुढील वर्षी लिस्ट होणार समभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फूड डिलिव्हरी क्षेत्रातील कंपनी स्विगी भारतीय शेअर बाजारामध्ये लिस्ट होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या संदर्भातील तयारीमध्ये कंपनीने सध्या लक्ष घातले आहे. सध्याला यासंदर्भात स्विगी 8 बँकांशी चर्चाही करत असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.
कंपनीचा समभाग शेअरबाजारामध्ये 2024 मध्ये सूचीबद्ध करण्यात येणार आहे. स्विगीची स्पर्धक कंपनी झोमॅटो यांचा समभाग शेअरबाजारात सूचीबद्ध झाला असून झोमॅटोच्या समभागामध्ये वर्षभरामध्ये जवळपास 54 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. अशा स्थितीमध्ये स्विगीनेही आता बाजारामध्ये सूचीबद्ध होण्यासाठीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये बाजारांमधील नकारात्मक वातावरणाचा विचार करून समभाग सूचीबद्ध होण्यासंदर्भातील प्रक्रियेला काही प्रमाणात थांबवले होते.
कधी होणार लिस्ट ?
2022 मध्ये कंपनीचे मूल्यांकन 10.7 अब्ज डॉलर इतके होते. येत्या सप्टेंबरमध्ये आयपीओ आणण्याच्या प्रक्रियेलाही कंपनीने वेग दिला असून 8 बँकांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे समजते. तयारीच्या तुलनेमध्ये पाहता कंपनीचा समभाग बाजारामध्ये जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









