काखेत दाबून तयार होतात लाडू
तुम्ही आजवर अनेक प्रकारच्या डिशेसची चव चाखली असेल, प्रत्येक ठिकाणी खास डिश असते, जी खाणे लोक पसंत करतात, या डिशेजचे चाहते लोक याकरता मोठी रक्कमही खर्च करण्यास तयार असतात. चीनमध्ये विचित्र मांसाहार केला जात असतो. तर जपानमध्ये घामयुक्त लाडू खाल्ले जातात.
हे लाडू घामाच्या स्थितीतच तयार केले जातात. जपानच्या स्पेशल राइस बॉलला सुंदर युवतींच्या काखेत दाबून तयार केले जाते. तर त्यापूर्वीच त्यासाठी भात शिजविला जात असतो. यानंतर हा भात थंड करत महिलांच्या काखेत तो ठेवून अन् दाबून त्याला आकार दिला जातो. हा राइस बॉल जपानमध्ये अत्यंत आवडीने खाल्ला जातो. या राइस बॉलच्या निर्मितीसाठी अनेक रेस्टॉरंटमध्ये युवतींची भरती केली जाते. हा राइस बॉल खाण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. परंतु याच्या निर्मितीची पद्धत आणि नियम अत्यंत कठोर असहेत. जर याचे नियम पाळले न गेल्यास राइस बॉलला त्याची वेगळी चव प्राप्त होत नाही.
काखेत ठेवून तयार केल्या जाणाऱ्या या राइस बॉलची चव अत्यंत आगळीवेगळी असते. याच्या निर्मितीकरता केवळ आणि केवळ सुंदर युवतींना कामावर ठेवले जाते. भात शिजविल्यावर यात सॉस मिसळला जातो, यानंतर युवती याला स्वत:च्या काखेत ठेवून आकार देतात. याकरता युवतीला घामाचा दुर्गंध येऊ नये अशी अट असते. राइस बॉल तयार करताता काखेत भात चिकटल्यास तो खाण्यासाठी ग्राहकांमध्ये चढाओढ असते, आता जपानसोबत चीनमध्ये देखील हा राइस बॉल आवडीने खाल्ला जात आहे.









