चायना ओपनमध्ये चौथ्या फेरीत प्रवेश
वृत्तसंस्था / बीजिंग
विम्बल्डन विजेत्या इगा स्वायटेकने कॅमिला ओसोरियोचा पराभव करुन तिच्या कारकिर्दीतील 400 वा विजय मिळवला आणि सोमवारी चायना ओपनमध्ये चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीत युआन युवर सरळ सेटमध्ये विजय मिळवून सलग तीन हंगामातील डब्ल्युटीए 1000 स्पर्धांमध्ये 25 किंवा त्याहून अधिक विजय नोंदवणारी पहिली खेळाडू ठरलेल्या स्वायटेकने पहिल्या सेटमध्ये तिच्या कोलंबियन प्रतिस्पर्धला 6-0 असे पराभूत केल्याने खेळ मंदावण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्याआधी ओसोरियोने दुसऱ्या सेटच्या पहिल्या गेममध्ये सामन्यातून निवृत्ती घेतली. तिचा पुढील सामना अमेरिकन एम्मा नवारोशी होईल. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यांमध्ये चौथ्या मानांकित मिरा अँड्रीवाने जेसिका बोझास मॅनोरीओचा 6-4, 6-1 असा पराभव केला आणि मार्टा कोस्ट्युकने सॅस्नोविचचा 6-4, 6-2 असा पराभव केला.
बीजिंगमध्ये एकाचवेळी सुरू असलेल्या एटीपी 500 पुरूष स्पर्धेत, अव्वल मानांकीत यानिक सिनरने फॅबियन मोरोझनचा 6-1, 7-5 असा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. 24 वर्षीय इटालियन खेळाडूचा पुढील सामना तिसऱ्या मानांकीत अॅलेक्स डी मिनॉरशी होईल. ज्याने पहिला सेटमध्ये त्याचा प्रतिस्पर्धी जाकुब मेन्सिक दुखापतीमुळे निवृत्त झाल्यानंतर वॉकओव्हरने आगेकूच केली होती.









