वृत्तसंस्था / टोरँटो
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील कॅनडा खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत आतापर्यंत दोनवेळा विजेतेपद मिळविणारी अमेरिकेची जेसीका पेगुलाचे आव्हान तिसऱ्याच फेरीत सेव्हास्टोव्हाने संपुष्टात आणले. तर युक्रेनच्या दहाव्या मानांकीत स्वीटोलिनाने तसेच इगा स्वायटेकने प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले.
महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात सेव्हास्टोव्हाने पेगुलाचा 3-6, 6-4, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. दुसऱ्या एका सामन्यात इगा स्वायटेकने इव्हा लीसचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. आता सेव्हास्टोव्हा आणि जपानची ओसाका यांच्यात पुढील फेरीत गाठ पडेल. जपानच्या नाओमी ओसाकाने 22 व्या मानांकीत लॅटवियाच्या जेलेना ओस्टापेंकोचा 6-2, 6-4 असा फडशा पाडला. अमंदा अॅनिसीमोव्हाने राडुकेनुचा 6-2, 6-1 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. अॅनिसीमोव्हाचा पुढील फेरीतील सामना युक्रेनच्या स्वीटोलिनाशी होणार आहे.









