वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट (जर्मनी)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या स्टुटगार्ट महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक तसेच रशियाची पोटापोव्हा यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

गुरुवारी झालेल्या सामन्यात स्वायटेकने चीनच्या झेंग क्विनवेनचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. अन्य एका सामन्यात कॅरोलिना प्लिसकोव्हाने व्हेकिकवर 6-2, 6-7(5-7), 7-6(7-5), रशियाच्या अॅनेस्टेसिया पोटापोव्हाने अमेरिकेच्या कोको गॉफचा 6-2, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.









