करवीर तालुक्यातील स्वयंभूवाडी येथील स्वयंभू नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे सर्वत्र निर्बंध असल्याने स्थानिक प्रशासनाने यात्रा रद्द केली होती. चालू वर्षी शासनाने यात्रास्थळावरील सर्व निर्बंध उठवल्याने मोठ्या उत्साहात भाविकांनी यात्रेसाठी हजेरी लावली. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
करवीर तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या स्वयंभूवाडी येथे श्री स्वयंभू हे एक प्राचीन जागृत देवस्थान आहे. करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील लाखो भाविकांचे ते श्रद्रधास्थान आहे. दरवर्षी नागपंचमी निमित्त भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
पहाटे सव्वाबारा वाजता स्थानिक पुजारी रघुनाथ गुरव व भगवान गुरव यांच्या उपस्थितीत सरपंच सदाशिव बाटे यांच्या हस्ते अभिषेक घालून पूजा करण्यात आली. यानंतर भाविकांची दर्शनासाठी हळूहळू गर्दी होऊ लागली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने यात्रेनिमित्त गेली आठवडाभर सर्व उपाययोजना व तयारी सुरू केली होती. मंदिर व मंदिर परिसराची स्वच्छता करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी दर्शन मंडप व लाईन यांच्या बरोबरच लाईट व्यवस्था वाहन पार्कींग व्यवस्था उत्तम केलीयं. कायदा व सुव्यवस्थापनाच्या नियोजनासाठी पोलीस बंदोबस्त कार्यरत होता.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पावसाची उघडीप असल्यामुळे भाविकांचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. लहान मुलांसह अबाल वृद्ध, महिला व पुरुष यात्रेमध्ये दर्शनासाठी सहभागी झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









