कोल्हापूरः
केर्ले येथील कुमार व कन्या विद्यामंदिर या शाळेचे गेट अंगावर पडून स्वरुप माने या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षिका वंदना माने व कृष्णात शामराव माने यांना अटक झाली.
स्वरुपला गेटला बांधलेली दोरी व ओढणी सोडून गेट बाजुला सरकवायला सांगितले. हे करत असताना हे लोखंडी गेट स्वरुपच्या डोक्यावर आदळले आणि तो गंभीर जखमी झाला. हे गेट खूप जड असल्याने ते सरकवणे हे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या स्वरुपच्या आवाक्याच्या बाहेरचे असतानाही त्याला हे काम करावयास सांगितले. दोन्ही आरोपींच्या निष्काळजीपणामुळे स्वरुप सोबत ही दुर्दैवी घटना घडली आणि हे गेट धोकादायक परिस्थिती ठेवल्याने स्वरुपचा अपघात झाला अशी फिर्याद स्वरुपचे काका विक्रमसिंह भीमराव माने यांनी दिली आहे.








