तनुज सिंग, युवराज मोहनगेकर यांची चमक
बेळगाव : राजकोट येथे 68 व्या राष्ट्रीय एसजीएफआय जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू स्वरूप सतीश धनुचे (सेंट पॉल्स स्कूल) यांनी कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 1 सुवर्ण, 2 रौप्य पदकांची कमाई केली तर तनुज व युवराज चमकले. एसजीएफआय राष्ट्रीय स्पर्धेत 200 मी. बटरफ्लायमध्ये सुवर्ण, 100 मी. बटरफ्लाय व 4×100 मी. मिडले रिलेमध्ये रौप्य अशी एकूण 3 पदके संपादन केली. तनुज राकेश सिंग (सेंट मेरीज स्कूल) याने 4×100 मी. मिडले रिलेमध्ये ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात भाग घेऊन कर्नाटक राज्याला रौप्य पदक मिळवून दिले. युवराज संतोष मोहनगेकर (सेंट झेवियर्स स्कूल) याने 1 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात कांस्य पदक संपादन केले. हे या स्पर्धेतील कर्नाटकाला मिळालेले डायव्हिंग मधील एकमेव पदक ठरले. वरील सर्व विजेत्या जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते, रणजीत पाटील, सतीश धनुचे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते.









