Swarda Kambli success in CA exam
देवबाग तसेच मालवण शहर येथील मूळ रहिवासी स्वरदा हेमदिप कांबळी ही चार्टड अकांउंटट (सनदी लेखापाल) ची अंतिम परिक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. कांबळी कुटुंबिय सध्या ठाणे येथे वास्तव्यास आहेत. स्वरदा हिचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले आहे. मुलुंड कॉलेज ॲाफ कॉमर्स येथून तिने बी. कॉम.ची पदवी मिळवली. आता ‘दी इन्स्टिट्युट ॲाफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ॲाफ इंडिया’ येथून तिने सीए पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. स्वरदा मालवण येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती दिपश्री कांबळी यांची नात आहे. स्वरदाचे वडील हेमदिप हे एअर इंडिया येथून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई हेमांगी लार्सन ॲन्ड टुब्रो लिमिटेड कंपनीत जाॅईंट जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहे.
मालवण / प्रतिनिधी