‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून राज्यात गेल्या काही दिवसापासून वादंग सुरु असतानाच हा चित्रपट झी मराठी वर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचा प्रोमो झी मराठी वाहिनीवरून केला जात आहे. यावरुन आता स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे.आज मुंबई मधील कार्यालया समोर कार्यकर्त्यांनी झी च्या पत्रिकांची होळी केली. याचबरोबर झी मराठी ला २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून झी ने माघार घेतली नाही तर राज्यभरात झी वाहिनी कार्यालयांवर लक्ष करण्यात येईल व झी Boycott मोहीम घेवून झी विरोधात जनजागृती करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
हर हर महादेव सिनेमामध्ये इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडण्यात आला असून त्यामुळे धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या इतिहासाला डाग लागत असल्यामुळे स्वराज्य ने सुरुवातीपासूनच सिनेमाला विरोध केला आहे. दरम्यान झी वाहिनीने हा चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी महाराष्ट्रातून जमलेल्या कार्यकर्त्यांनी झी च्या कार्यालया समोर चांगलाच गोंधळ घातला.
यावेळी स्वराज्य चे पदाधिकारी करण गायकर, धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर, आप्पासाहेब कुडेकर, मंगेश कदम ,गणेश कदम, केशव गोसावी, तिरुपती भगणुरे , सदानंद पुयड , राहुल गावडे , अशिष हिरे , रुपेश नाठे ,विनोद परांडे , द्वारकेश जाधव , नवनाथ शिंदे , दिनेश नरवडे , वैभव दळवी, राहुल लांडगे, विजय वाहुळे , प्रथमेश पुडे , महेश पुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleवसंत मोरे समर्थक माझिरेंचा शिंदे गटात प्रवेश
Next Article नौदलात उद्या दाखल होणार INS मुरमुगाव









