म्हापसा : सम्राट क्लब हळदोणा आणि स्वर गंधार कला केंद्र नास्नोळा यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी संगीत सभा ‘स्वर तरंग… एक परंपरा’ संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात सितार वादक सम्राट योगेश हिरवे उपस्थित होते. सम्राट क्लब हळदोणा अध्यक्षा सौ मंगल हळदणकर यांच्याकडून त्यांना पुष्प रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. सौ मंगल हळदणकर यांनी आपल्या भाषणात सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाबद्दल अधिक माहिते दिली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
सर्वप्रथम स्वर गंधार कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. त्यांना हार्मोनिअमवर सिद्धी देऊ दाभाळे हिने तर तबला साथ क्रिशय गोपिकांत शिरोडकर यांनी केली. केनिषा गोपिकांत शिरोडकर हिने गणेश कौतुवं हे भरतनाट्याम नृत्य सादर केले. गायन विभागात थानिशा गजानन सांखळकर हिने राग-देस, काव्या राजन तुवेकर हिने राग – यमन, प्रिती गोपिकांत शिरोडकर राग-अलैय्या बिलावल, रेणु राजन तुवेकर राग-बागेश्री, त्यांना हार्मोनियम साथ सिद्धी देऊ दाभाळे तर तबला साथ ऋषिकेश पांचाळ यांनी केली. तबला स्वतंत्र वादनात प्रियांशु अशोक घाडी यांनी ताल-झपताल, दिप्तेश दामाजी केरकर यांनी ताल- एकताल, क्रिशय गोपिकांत शिरोडकर याने ताल-ऊपक सादर केला. त्यांना लेहेरा साथ ऋषिकेश पांचाळ यांनी केली.
खास निमंत्रित कलाकार प्रणव अवधुत च्यारी यांनी शास्त्राrय सितार वादन केले. त्यांना तबला साथ कौस्तुभ पांडुरंग च्यारी यांनी केली. रेणु राजन तुवेकर हिच्या भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व कलाकारांना सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र देण्यात आली. सम्राट रमाकांत अणवेकर यांनी सम्राट क्लब हळदोणातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती दिली व स्थानिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी अभिलाषा व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सम्राट क्लब हळदोणा व स्वर गंधार कला केंद्र नास्नोळा यांचे कौतुक केले आणि उभरत्या युवा तसेच बाल कलाकारांना अशा प्रकारच्या व्यासपीठाची खूप गरज असते असे सांगितले. सम्राट सर्वेश रायकर यांनी ध्वनिसंकलन केले तर स्वर गंधार कला केंद्राचे अध्यक्ष सम्राट गोपिकांत शिरोडकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. याप्रंसगी प्रमुख पाहुणे सम्राट योगेश हिरवे, अध्यक्षा सौ मंगल हळदणकर, सम्राट गोपिकांत शिरोडकर, सम्राट सर्वेश रायकर, ऋषिकेश पांचाळ, रक्षंधा आमोणकर, दिलीप म्हालदार, पुंडलिक बांदोडकर उपस्थित होते.









