प्रतिनिधी रत्नागिरी
Ratnagiri Crime News : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खूनाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले आहे.पती सुकांत सावंत व अन्य दोघाजणांना पोलिसांकडून आरोपी करण्यात आले आहे.घटनेच्या दिवशी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने सर्व खटल्याची सर्व भिस्त ही परिस्थितीजन्य पुराव्यावर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.सुकांत व त्याची पत्नी स्वप्नाली सावंत हे राजकारणाशी संबंधित असल्याने या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी या खूनाचा तपास केला.स्वप्नाली सावंत हिच्या खून प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई सावंत,रूपेश उर्फ रूप्या कमलाकर सावंत व पमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (रा. सर्व रा. मिऱ्याबंदर रत्नागिरी) यांच्याविरूद्ध दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे. स्वप्नाली हिचा खून केल्यानंतर आरोपी यांनी मृतदेह जाळून हाडे समुद्रात फेकून दिली होती.यातील काही हाडे ही पोलिसांना आढळली आहेत.ही हाडे पोलिसांनी डीएनए रिपोर्टसाठी पाठवली आहेत.हा रिपोर्टही खटल्यात अत्यंत महत्वाचा असल्याचे मानले जात आहे.
खटल्यातील माहितीनुसार,भाई सावंत व त्याची पत्नी स्वप्नाली यांच्यात मागील काही वर्षापासून वाद सुरू होता. यातून स्वप्नाली सावंत यांनी यापूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.स्वप्नाली सावंत या भाई सावंत याच्यापासून शहरातील एका सदनिकेत वेगळ्या राहत होत्या.गणपती सणासाठी स्वप्नाली सावंत या भाई सावंत याच्या मिऱ्याबंदर येथील घरी आल्या होत्या.मागील वाद भाई सावंत याच्या मनात धुमसत असल्याने स्वप्नाली हिचा काटा काढण्याची हिच योग्य वेळ असल्याची खूणगाठ भाई सावंत याने बांधली.त्यानुसार भाई सावंत याने रूपेश सावंत व पम्या या दोघांनाही सोबत घेवून स्वप्नाली हिचा काटा काढण्याचा प्लान तयार केला, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
1 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 च्या सुमारास भाई सावंतसह अन्य दोघा आरोपींनी स्वप्नाली सावंत हिचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला.तसेच मृतावस्थेत पडलेल्या स्वप्नाली यांचा मृतदेह किचनमधून घराच्या मागच्या बाजूला नेण्यात आला.येथे स्वप्नाली सावंत यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले.संशयित आरोपी सुकांत सावंत याने कोणताही पुरावा मागे राहू नये,यासाठी स्वप्नाली सावंत हिची राख समुद्रात टाकून दिली,असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे.
लवकरच सत्र न्यायालयात खटल्याला प्रारंभ
पोलिसांना आपल्यावर संशय येवू नये, यासाठी भाई सावंत याने स्वतहून रत्नागिरी शहर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तकार दाखल केली. मात्र भाई सावंत याच्या जबाबामध्ये पोलिसांना विसंगती आढळल्याने पोलिसांनी भाई सावंत याची कसून चौकशी केली असता खूनाचा उलघडा झाला होता. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकंडून आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लवकरच सत्र न्यायालयात खटल्याला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
Previous Articleकोल्ह्याच्या हल्ल्यात २५ शेळ्या मृत्युमुखी
Next Article पुण्यात 3700 सराईतांविरूद्ध कारवाईचा बडगा









