बालिका आदर्शला दुहेरी मुकुट
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व स्वाध्याय विद्यामंदिर स्कूल आयोजित छत्रपती शिवाजी क्लस्टर शहापूर अनगोळ, टिळकवाडी प्राथमिक विभागीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वाध्याय विद्या मंदिरने ठळकवाडीचा तर मुलींच्या गटात बालिका आदर्शने डीपी संघाचा, थ्रोबॉल स्पर्धेत ठळकवाडीने गोमटेश मजगावचा तर मुलींमध्ये बालिका आदर्शने डीपीचा पराभव करून विजेतेपद पटकविले. व्हॉलीबॉल स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठळकवाडी संघाने चिटणीस संघाचा 15-10, 15-11 तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्वाध्याय विद्या मंदिरने गोमटेश मजगावचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात स्वाध्याय विद्या मंदिरने ठळकवाडी संघाचा 15-13, 13-15, 15-13 अशा सेटमध्ये पराभव करून विजेचेपद पटकाविले. मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बालिका आदर्शने स्वाध्याय विद्यामंदिरचा 15-10, 15-12 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात डीपी संघाने प्लेझंट कॉन्व्हेंट संघाचा 15-12,15-8 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात बालिका आदर्शने डीपी संघाचा 15-13, 15-11 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. बालिकाचा स्कूलच्या टर्फ मैदानावरती खेळवण्यात आलेल्या थ्रोबॉल प्रकारातील पहिल्या सामन्यात मुलीच्या विभागात बालिका आदर्शने केएलएसचा 15-9, 15-10 असा तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात डीपी संघाने संघमित्रा संघाचा 15-12, 15-13 पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बालिका आदर्शने डीपी संघाचा 15-13, 16-14 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात ठळकवाडी संघाने शानभाग संघाचा 15-8, 15-9 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात गोमटेश मजगाव संघाने ज्ञानमंदिर संघाचा 15-09, 15-11 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात ठळकवाडी संघाने गोमटेश मजगाव संघाचा 15-10,15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे स्वाध्याय विद्यामंदिर स्कूलच्या मुख्याध्यापिका हेमलता कुलकर्णी, उमेश मजुकर, बापू देसाई, प्रवीण पाटील, रामलिंग परीट, उमेश बेळगुंदकर, शिवा सिनकंद, आर. पी. वंटगुडी, देवेंद्र कुडची, अनिल मुगळीकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले









