माजी खासदार राजू शेट्टी : जयसिंगपुरात शनिवारी स्वाभिमानीची ऊसपरिषद
जयसिंगपूर प्रतािनिधी
ऊस परिषदेमध्ये प्रामुख्याने गेल्या वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळाले नाही तर पुढील दिशा काय असावी यावर चर्चा होईल यावर्षीच्या उसावर एफआरपी एकरकमी घेण्याबरोबरच अधिक किती घ्यायचे यावरही चर्चा होईल. काटामारीबाबत योग्य ते धोरण शासनाने न ठरवल्यास आंदोलनाची दिशा काय असावी हे ठरवण्यात येणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊसपरिषद शनिवार दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होत आहे. या परिषदेच्या निमित्ताने सर्व जय्यत तयारी झाली असून मोठ्य़ा संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेट्टी म्हणाले, गेल्या ऊस परिषदेमध्ये आम्ही केलेली मागणी अनाठाई नव्हती. कारण एफआरपी साखरेला 3100 दर पकडून निश्चित करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात 3200 ते 3300 रुपये भाव मिळाला. त्याशिवाय सबसिडी शिवाय निर्यात झालेली साखरेचा 3400 रुपये भाव गेल्यामुळे कारखानदारांचा दीडशे ते दोनशे रुपये फायदाच झाला. इथेनॉल उत्पादनामुळे गतवर्षी 350 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यात कारखानदारांचे काहीच नुकसान झाले नाही तर अधिक फायदा झाला. कमी खर्चात साखरेचे उत्पादन झाले. एक टक्का रिकवरी कमी केली तर नऊ लिटर इथेनॉल उत्पˆ होते. त्यामध्ये कारखानदारांना 239 रुपये फायदाच झाला. त्यातील हिस्सा ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना दिलाच पहिजे. केंद्राचा कायदा बदलण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. एफआरपीची रक्कम दोन टफ्फ्यात द्यावी, अथवा रिकव्हरीवर एफआरपी ठरवावी हे धोरणच मुळात चुकीचे आहे.
हे ही वाचा : कर्नाटक हिजाब बंदी : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता
अद्याप साखर आयुक्तांकडून दोन वर्षाचे ऑडटही झालेले नाही. चुकीच्या पद्धतीमुळे अधिकृत व अनाधिकृत साखर उत्पादनामुळे दोन पॉईंट 25 कोटीच्या जीएसटीचे नुकसान झाले. बाहेरून वजन केलेला ऊस कारखानदार स्वीकारत नाहीत. साखर आयुक्त यांनी संगणकीय पद्धत वापरून वजन काटे निर्माण करावेत. जेणेकरून काटेमारी थांबेल. या कामी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. असेही शेट्टी यांनी सांगितले. यावेळी सावकर मादनाईक, शैलेश आडके, सागर मादनाईक, पै विठ्ठल मोरे, महावीर अक्कोळे, सागर शंभूशेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तरीही ऊस परिषद होणारच
सावकर मादनाईक म्हणाले, परतीचा पाऊस मोठय़ा प्रमाणात असला तरी ऊस परिषदेसाठी मोठय़ा संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहतील. ऊस परिषदेच्या तयारीच्या नामित्ताने विविध ठिकाणी सभा झाल्या असून ऊस पा†रषदेमध्ये नेमका काय निर्णय होणार याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.