शिरोळ : प्रतिनिधी
Shirol : येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदीप प्रकाश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान या निवडीनंतर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबजी गुलालाची उधळण करून आनंदच साजरा केला.
शुक्रवारी शिरोळ नगर परिषदेच्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी उपस्थिताचे स्वागत केले. नगरपालिकेचे वरिष्ठ क्लार्क संदीप चुडमुंगे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. नगरपरिषदेमध्ये राजश्री शाहू आघाडीची सत्ता असून आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे विद्यमान नगरसेवक एन वाय जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागेवर राजर्षी शाहू विकास आघाडी तर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदीप चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे, सौरभ शेट्टी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे, प्रहार संघटनेचे दगडू माने, नगरसेवक योगेश पुजारी तातोबा पाटील श्रीवर्धन माने देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष कमलाबाई शिंदे, जयश्री धर्माधिकारी, कुमोदिनी कांबळे, सुवर्णा कोळी, पंडित काळे, डॉ अरविंद माने, एन.वाय.जाधव, इमरान अत्तार यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









