वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या डीसी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इलिना स्विटोलिनाने बेलारुसच्या अझारेंकाचा पराभव करत पुढील फेरी गाठली. स्विटोलिनाचा हा अझारेंकावरील अलीकडच्या कालावधीत सलग दुसरा विजय आहे. या सामन्यानंतर औपचारिकता म्हणून उभय खेळाडूमध्ये हस्तांदोलन करण्यात आले नाही.
महिला एकेरीच्या सामन्यात युक्रेनच्या स्विटोलिनाने अझारेंकाचा 7-6(7-2), 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. या लढतीत पहिला सेट ट्रायब्रेकरपर्यंत लांबला गेला पण स्विटोलिनाने आपल्या अचूक सर्व्हिसच्या जोरावर अझारेंकांचे आव्हान संपुष्टात आणले.









