नवी दिल्ली
सुझुकी मोटर कंपनी लिमिटेडकडून पाकिस्तानमधील कार आणि दुचाकी प्रकल्प बंद करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्प 22 जून ते 8 जुलै या कालावधीत अॅक्सेसरीजच्या आयात निर्बंधांमुळे बंद राहणार असल्याची माहिती आहे. जपानी कार उत्पादक कंपनीचा पाकिस्तानातील चारचाकी वाहन कारखाना 75 दिवसांसाठी बंद होता, जो काही दिवसांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आला होता.
सुझुकी मोटरने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की कंपनीने गेल्या वर्षी मे महिन्यात सेंट्रल बँकेने स्वीकारलेल्या प्रणालीमुळे सुटे भाग आणि वस्तूंची आयात कमी केली आहे. त्यामुळे परिणामी कंपनीला आपले उत्पादन थांबवावे लागले होते. गेल्या वर्षी मे मध्ये, स्टेटबँक ऑफ पाकिस्तानने कंपन्यांना किट आयात करण्यापूर्वी परवानगी घेण्याचे आदेश दिले होते.









