मडगाव : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारूती सुझुकी ने गोव्याच्या बाजारपेठेत आपली मिनी ट्रक ‘सुझुकी सुपर कॅरी’ ला जास्त पॉवरफुल व्हेरियंट मध्ये लाँच केले आहे. कंपनीनें सुपर कॅरीला लाइट कमर्शियल व्हीकलला अपग्रेड केले आहे. जे आधीच्या तुलनेत जास्त पॉवरफुल आणि फ्यूल एफिशियंट आहे. मडगावात मारूती सुझुकीच्या शोरूममध्ये उद्योजक नेश्विन मार्टीन यांच्या हस्ते सुझुकी सुपर कॅरीचे लाँचिंग करण्यात आले. यावेळी सीईओ – तेजश्री पै, जीएम – मारिओला फर्नांडिस, सहाय्यक महाव्यवस्थापक-सिद्धेश तेंडुलकर, माऊती टेरिटरी सेल्स मॅनेजर- ऑल्विन कुयेल्हो व सेल्स मॅनेजर-सुरेंद्र कलाल उपस्थित होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही मिनी ट्रक त्या लोकांसाठी बनवला आहे. ज्यांना जबरदस्त क्वॉलिटी आणि परफॉर्मन्स हवे आहे. 2023 मारूती सुपर कॅरी मिनी ट्रकमध्ये आता एक लीटर अडवॉन्स्ड के सीरीज ड्युअल जेट आणि ड्युअल VVT इंजिन मिळते. माऊती सुझुकीने आपली नवीन पॉवरफुल मिनी ट्रक 2023 माऊती सुझुकी सुपर पॅरीला लाँच केले आहे. जी आधीच्या तुलनेत जास्त पॉवरफुल आणि खास सेफ्टी फीचर्स सोबत येते. ही सुपर पॅरी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शनमध्ये आहे. याला 4 व्हेरियंट मध्ये आणले आहे. पॅरीचे Gasoline Deck व्हेरियंटची किंमत 5.30 लाख ऊपये,Gasoline Cab Chassis व्हेरियंटची किंमत 5.15 लाख ऊपये, CNG Deck व्हेरियंटची किंमत 6.30 लाख ऊपये आणि CNG Cab Chassis व्हेरियंटची किंमत 6.15 लाख ऊपये आहे. या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत.
Previous Articleदवर्ली येथे ‘अँपिअर’ शोरूमचे उद्घाटन
Next Article गोवा डेअरीकडून दुध उत्पादकांना अजूनही लाभांश नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









