दुसऱ्या तिमाहीत नफा 85 टक्क्यांनी वाढला
नवी दिल्ली :
आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) सुझलॉन एनर्जीचा नफा वार्षिक आधारावर 540 टक्क्यांनी वाढून तो 1,279 कोटींवर पोहचला आहे. पहिल्यांदाच कंपनीने इतका मोठा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 200 कोटी रुपयांचा होता.
सुझलॉन एनर्जीचा एकत्रित कामकाजाचा महसूल वर्षाच्या आधारावर 85 टक्क्यांनी वाढून 1,866 कोटींवर पोहचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल 2,093 कोटी रुपयांचा होता.
समभागाचा 1 महिन्यात 11 टक्के परतावा
निकालानंतर सुझलॉन एनर्जीचे शेअर्स 1.03 टक्क्यांच्या वाढीसह 60 वर व्यवहार करत आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 11 टक्के वाढला आहे. एका वर्षात कंपनीचा शेअर 10 टक्केनी घसरला. त्याचवेळी, गेल्या 6 महिन्यांत शेअर 5 टक्के वाढला आहे.









