47.6 मेगावॅट पवन ऊर्जेचा प्रकल्पाचे कंत्राट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सुझलॉनला केपी समूहाकडून 47.6 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. यामध्ये सुझलॉन प्रकल्पासाठी एस133 विंड टर्बाइनचा पुरवठा करणार आहे. यासोबतच प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत असणार असल्याची माहिती आहे.
नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन्स करीता सुझलॉन ग्रुपने गुजरातमधील केपी ग्रुपकडून 47.6 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवले आहे. मात्र, कंपनीने या कराराची किंमत सध्याच्या घडीला जाहीर केलेली नाही. हा प्रकल्प भदुच जिह्यातील वाघरा येथे राहणार आहे.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की हा प्रकल्प 2024 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या आकाराच्या प्रकल्पामुळे 36,000 घरे उजळू शकतात आणि कार्बन उत्सर्जन वार्षिक 1.42 लाख टन कमी होऊ शकते.
सुझलॉन समूह प्रकल्पासाठी एस 133 विंड टर्बाइनचा पुरवठा करेल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
यासोबतच ती या प्रकल्पालाही सुरुवात करणार आहे. सुझलॉन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेपी चालसानी म्हणाले, ‘या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज व्यावसायिक आणि औद्योगिक (सीडीआय) ग्राहक वर्गाला पुरविली जाईल’ असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.









