नवी दिल्ली :
ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीने मार्चअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफा कंपनीने पाचपट अधिक नोंदवला असल्याची माहिती आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत कंपनीने 1181 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत पाहता कंपनीने 254 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. कंपनीने याच अवधीत 3825 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न कमावले आहे. तर मागच्या वर्षी याच अवधीत हे उत्पन्न 2207 कोटी रुपयांचे होते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने एकत्रित निव्वळ नफा 2072 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या आर्थिक वर्षात हा नफा 660 कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्षात 10,993 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे. जे मागच्या आर्थिक वर्षात कंपनीने 6568 कोटी रुपये इतके होते.









