क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व बेळगाव शहर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाच्या कुस्तीपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
जिल्हा क्रीडा वसतीगृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये प्राथमिक मुलींच्या विभागात 33 वजनी गटात अदिती सचिन कोरे प्रथम क्रमांक व मनस्वी यलाप्पा जायाण्णाचे द्वितीय क्रमांक, 30 किलो वजनी गटात समिधा भोमेश बिर्जे प्रथम क्रमांक, 36 किलो वजनी गटात श्रद्धा यल्लाप्पा पाटील द्वितीय क्रमांक पटकाविला. माध्यमिक विभागात मध्ये 53 किलो वजनी गटात शितल सुतार प्रथम क्रमांक व 43 वजनी गटात जानवी जोतीबा पाटीलने द्वितीय क्रमांक पटकाविला. शितल, समिधा, अदिती यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पंच म्हणून एकलव्य पुरस्कार विजेती स्मिता पाटील यांनी काम पाहिले. त्यांना राष्ट्रीय कुस्ती कोच मारुती घाडी व उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शाळेचे चेअरमन जी. एन. फडके व सहसचिव अंनत गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मजुंनाथ गोल्लीहळ्ळी यांचे प्रोस्ताहन मिळत आहे.









