बेळगाव प्रतिनिधी – कर्नाटक राज्य बॉक्सिंग संघटना आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेळगावच्या बॉक्सिंग संघाने घवघवीत यश संपादन केले आहे. जलहल्ली एचएमटी मैदान बेंगळूर येथे आयोजित या स्पर्धेत बेळगाव जिल्हय़ाच्या बॉक्सर्सनी भाग घेऊन यश संपादन केले आहे. त्यामुळे मल्लाप्पा करगुप्पी याने 45 ते 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक, विशाल निंबाळकर याने 48 ते 51 किलो वजनी गटात रौप्य पदक, उमर फारूकने 51 ते 54 किलो वजनी गटात कांस्य पदक, महेश मासूदने 60 ते 63 किलो वजनी गटात रौप्य पदक, समर्थ हिरेकोडीने 67 ते 71 किलो वजनी गटात कांस्य पदक, अभिषेक चौगुलेने 71 ते 75 किलो वजनी गटात रौप्य पदक. मुलींच्या गटात सदा बेगने 54 ते 57 किलो गटात रौप्य पदक, श्रीकांत गोंधळीने 63.5 ते 67 किलो गटात रौप्य पदक पटकाविले.
ज्युनियर गटात प्रथमेश गर्डे 46 ते 48 किलो वजनी गटात सुवर्ण, वेंकटेश गर्डेने 52 ते 54 गटात कांस्य पदक, रितू मिश्राने 52 ते 54 गटात रौप्य पदक पटकाविले. सबज्युनियर गटात प्रितम शेट्टरने 35 ते 37 किलो गटात रौप्य पदक, श्रवण पाटीलने 40 ते 43 किलो गटात सुवर्ण, कौस्तुब मिरजकरने 33 ते 35 किलो गटात रौप्य, समर्थ गस्तीने 46 ते 49 गटात कांस्य पदक, निरंजन पाटीलने 55 ते 58 किलो गटात रौप्य पदक, सुदीप मासुती 49 ते 52 किलो गटात सुवर्ण, श्रुती पाटीलने 38 ते 40 गटात रौप्य पदक, ज्ञानेश्वरी धुडुमने 54 ते 57 किलो गटात सुवर्ण पदक पटकाविले.
12 वर्षा खालील मुला मुलींच्या गटात साईनाथ कांबळेने 54 ते 56 किलो गटात सुवर्ण, सोहम सुतारने 30 ते 32 किलो गटात रौप्य, स्फुर्ती वालीने 30 ते 33 किलो गटात सुवर्ण, गायत्री हलगेकरने 30 ते 32 किलो गटात सुवर्ण, श्रावणी पाटीलने 50 ते 53 किलो गटात सुवर्ण, यासीका हिरेमठने 47 ते 50 किलो गटात सुवर्ण, प्रिया शेट्टरने 35 ते 37 किलो गटात रौप्य पदक पटकाविले. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे केएबीएचे चेअरमन डॉ. मंजीगौडा, सचिव एन. साई सतिश, कॅप्टन सी. नारायण, कॅप्टन धनसंजयन, वेणुगोपाल यांच्या हस्ते सर्व विजेत्या बॉक्सिंगपट्टूना पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. या सर्व बॉक्सिंगपट्टूना अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.









