वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड महिला क्रिकेट संघातील येथे सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील एकमेव कसोटीत शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 473 धावांचा डोंगर रचला. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडने नाबाद शतक (137) नोंदवले तर एलीस पेरीचे शतक केवळ एका धावेने हुकले. चहापानावेळी इंग्लंडने पहिल्या डावात 1 बाद 68 धावा जमविल्या होत्या.
या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 7 बाद 328 धावा जमविल्या होत्या. एलीस पेरीने 153 चेंडूत 15 चौकारांसह 99, मॅकग्राने 83 चेंडूत 8 चौकारांसह 61, बेथ मुनीने 57 चेंडूत 4 चौकारांसह 33, लिचफिल्डने 32 चेंडूत 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या होत्या. जोनासेन 11 धावांवर बाद झाली. कर्णधार हिलीला आपले खाते उघडता आले नाही. गार्डनरने 76 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 40 धावा जमविल्या.

ऑस्ट्रेलियाने 7 बाद 328 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. 39 धावावर नाबाद राहिलेल्या सदरलँडने आक्रमक फटकेबाजी करत 184 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह नाबाद 137 धावा झळकाविल्या. किंग आणि सदरलँड यांनी 8 व्या गड्यासाठी 47 धावांची भर घातली. किंग बाद झाल्यानंतर गार्डनरने किम गर्थसमवेत 9 व्या गड्यासाठी 95 धावांची भागिदारी केल्याने ऑस्ट्रेलियाला 473 धावांपर्यंत मजल मारता आली. गर्थने 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने 8 बाद 439 धावांपर्यंत मजल मारली होती. उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाचे शेवटचे 2 फलंदाज 34 धावांची भर घालत तंबूत परतले. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोन यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 129 धावात 5 तर बेल आणि फिलेर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. क्रॉसने 1 बळी मिळविला.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरुवात केली. लँब आणि ब्यूमाँट यांनी सलामीच्या गड्यासाठी 36 धावांची भागिदारी केली. सदरलँडने लँबला 10 धावांवर झेलबाद केले. चहापानावेळी ब्यूमाँट 8 चौकारांसह 41 तर कर्णधार नाईट 3 चौकारांसह 12 धावांवर खेळत आहे. सदरलँडने 14 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : प. डाव 124.2 षटकात सर्व बाद 473 (सदरलँड नाबाद 137, पेरी 99, मॅकग्रा 61, मुनी 33, लिचफिल्ड 23, जोनासेन 11, गार्डनर 40, किंग 21, गर्थ 22, हिली 0, अवांतर 21, इक्लेस्टोन 5-129, बेल 2-91, फिलेर 2-99, क्रॉस 1-102), इंग्लंड : प. डाव 19 षटकात 1 बाद 68 (लँब 10, ब्यूमाँट खेळत आहे 41, नाईट खेळत आहे 12, अवांतर 5, सदरलँड 1-14).
(धावफलक चहापानापर्यंत









