बेळगाव/
मारुतीनगर परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या पंतबाळेकुंद्री येथील एका तरुणाला बुधवारी माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
आफताब शिराज बेपारी (वय 21) रा. पंतबाळेकुंद्री असे त्याचे नाव आहे. बुधवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास मारुतीनगर परिसरात तो संशयास्पदरीत्या फिरत होता. नव्या बांधकामासमोर ठेवलेले लोखंड व इतर वस्तू निरखून पहात होता. चोरी करण्याच्या उद्देशाने तो फिरत असणार, या संशयाने पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी खबरदारी म्हणून त्याला अटक केली आहे.









