Satara Panchgani : पंजाबच्या बठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर १२ एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले यातच जावळी तालुक्यातील करंदोशी ता. जावळी येथील जवान तेजस मानकर याचा या गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना केलेल्या मेलनुसार, जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपारपर्यंत गावी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय यांनी सांगितली आहे.
सैन्य दलातील परस्परातील मतभेदामुळे गोळीबार झाल्याचा पंजाब पोलिसांचा व सैन्य दलातील पोलिसांचा संशय आहे. एशियन न्यूज वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार संबंधित गोळीबार हा दहशतवादी घटना नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले.सध्या या घटनेवर हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने निगराणी केली जात आहे.
याप्रकरणी काही संशयीतांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सैन्य तळावर बाहेरून आलेल्या व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. परस्परांमधील मतभेदामुळे जवान मरण पावले असल्याचे काही वृत्तामध्ये प्रसिद्ध झाले आहे. याप्रकरणी काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस महानिर्देशक एडीजी सुरेंद्र पाल सिंह परमार यांनी कोणताही अतिरेकी हमला नसल्याचा दुजोरा दिला आहे.
Previous Articleमाडग्याळ,सोन्याळ,व्होसपेठ,गुड्डापूर,लांडेवाडीला पावसाने झोडपले; द्राक्ष,डाळींब, बेदाण्याचे नुकसान
Next Article Sangli : मंत्र सामर्थ्याच्या दाव्याला अंनिसचे आव्हान









