वृत्तसंस्था / लाहोर
फिफाने पाक फुटबॉल फेडरेशनवरील यापूर्वी घालण्यात आलेले निलंबन आता शिथील करण्यात आले आहे. विश्व फुटबॉल फेडरेशनच्या नियंत्रण समितीने (फिफा) आणि आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशनने (एएफसी) यांनी ही घोषणा केली आहे.
फिफाने यापूर्वी पाक फुटबॉल फेडरेशनवर (पीएफएफ) निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान फिफाच्या आदेशानुसार पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनने आपल्या घटनेतमध्ये बदल केले आहेत. लाहोरमध्ये गेल्या गुरुवारी झालेल्या पाक फुटबॉल फेडरेशनच्या बैठकीमध्ये घटनेतील नव्या बदल सुचीतेला अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात झालेल्या फिफाच्या बैठकीमध्ये पाक फुटबॉल फेडरेशनवरील निलंबनाची कारवाई प्रकरण संपविण्यासाठी घटनेत बदल करण्याचे आदेश देण्यात आला होता. 6 फेब्रुवारी रोजी पाक फुटबॉल फेडरेशनवर निलंबनाची कारवाई फिफाने केली होती. आता फिफाच्या कार्यकारी समितीने निलंबनाच्या कारवाईचा निर्णय मागे घेतल्याचे 2 मार्च रोजी घोषित केले. यापूर्वी म्हणजेच 2017 आणि 2021 साली फिफाने पाक फुटबॉल फेडरेशनवर दोनवेळा निलंबनाची कारवाई केली होती. तसेच 2022 जून रोजी पाक फुटबॉल फेडरेशनवरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा निर्णय फिफाने घेतला होता.









