कोल्हापूर प्रतिनिधी
शिस्तभंगाचा ठपका ठेवत दोन पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महेश संभाजी शिंदे ( पोलीस मुख्यालय), पोलीस हवलदार भाग्यश्री रविंद्र भोई ( हुपरी पोलीस ठाणे) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दोन दिवसांपूर्वी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
हुपरी पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असणाऱ्या भाग्यश्री भोई यांनी वर्दीवर असताना व्यक्तिगत कारणासाठी एकाला मारहाण केली होती. त्यांच्या विरोधात तक्रार आली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर यात भोई या दोषी आढळून आल्या होत्या. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर महेश शिंदे विरोधात महिलेला फोनवरून त्रास देणे, धमकी देणे, असा गुन्हा दाखल झाला होता. यामुळे पोलीस दलातील शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधिक्षक महिंद्र पंडित यांनी दोघांचे निलंबन केले आहे.








