फोंडा : फोंडा तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनीच्या विनयभंगप्रकरणी मुख्य संशयित असलेल्या ‘त्या’ शारीरिक शिक्षकाच्याविरोधात शाळा व्यवस्थापनाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून घटनेच्या कित्येक दिवसानंतर काल सोमवारी निलंबनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान काल सोमवारी पणजी येथील बाल न्यायालयाने शिक्षकाने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेऊन त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
गोवा शालेय नियम अधिनियम 1984 च्या कलम 11 (3) च्या तरतुदीनुसार त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करून शाळेच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांनी शारीरिक शिक्षकाला 6 सप्टे. पासून 15 दिवसासाठी निलंबनाचा आदेश जारी केला आहे. शारीरिक शिक्षकावर शाळेतील एका विद्यार्थीनीवर लैगीक छळाचा आरोप करण्यात आल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे 13 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाने 15 जुलै रोजी त्या शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही का सुरू केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण मागितले होते. व्यवस्थापनाकडूक कोणतीही कारवाई शिक्षकावर न केल्याने मुलीच्या पालकांनी रितसर तक्रार म्हार्दोळ पोलीस स्थानकात दाखल केल्यानंतर शारीरिक शिक्षकावर 28 ऑगस्ट रोजी विनयभंगप्रकरणी भा.दं.सं. 354, गोवा बाल कायदा 2003 चे कलम 8 (2) व पॉस्को कायद्याचे कमल 12 आणि 8 अंतर्गत गुन्हे नेंदविण्यात आले होते. त्याला अनुसरून अखेर शाळा व्यवस्थापनाने उशिरा का होईना त्dया संशयित शारीरिक शिक्षकाविरोधात निलंबनाचे आदेश जारी केले आहे.








