वृत्तसंस्था / नवी दिल्ली
द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स संघातून खेळणारा कॅगीसो रबाडा याने निर्बंध घातलेले उत्तेजक द्रव घेतल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर प्राथमिक स्वरुपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
रबाडाने काही वैयक्तिक समस्यांमुळे आयपीएल स्पर्धा अर्धवट टाकून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता. सदर आयपीएल स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याने मी उत्तेजक द्रवाचा वापर केल्याचे आढळून आल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला असल्याचे रबाडाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. आयपीएल स्पर्धेत खेळण्याची मला संधी दिल्याबद्दल मी स्पर्धा आयोजकांचा ऋणी आहे. माझ्यावर हंगामी स्वरुपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली असून मी लवकरच क्रिकेटमध्ये पुनरगामन करेन, असा विश्वास रबाडाने व्यक्त केला आहे.









