काठमांडू : 18 वर्षीय एका युवतीवर केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछने याला 8 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याने नेपाळ क्रिकेट मंडळाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. काठमांडू जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी या प्रकरणाचा निकाल घोषित करताना आरोपी आणि क्रिकेटपटू संदीप लामिछनेला 8 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचप्रमाणे 23 वर्षीय संदीपला 3 लाख रुपयांचा दंडही केला आहे. तसेच पीडित युवतीला 2 लाख रुपयांची रक्कम नुकसान भरपाई देण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. आता न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध संदीप लामिछने वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले.
Previous Articleस्पोर्ट्स mania
Next Article अमन सेहरावतला सुवर्णपदक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









