तीन वर्षांची शिक्षा अन् दंड
वृत्तसंस्था / विल्लुपुरम
तामिळनाडूच्या विल्लुपुरममध्ये लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या निलंबित आयपीएस अधिकाऱ्याला स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेश दास यांना न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच 10 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. दास दोषी ठरले असले तरीही त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत मिळाली आहे.
माजी अतिरिक्त पोलीस महासंचाक असलेले दास यांच्यावर 2021 च्या प्रारंभी एका कनिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. दास यांनी संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याला तक्रार नोंदविण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. दास यांनी पीडित महिला अधिकाऱ्याला धमकाविले देखील होते. तत्काली अण्णाद्रमुक सरकारने राजेश दास यांना निलंबित करत 6 सदस्यीय चौकशी समिती नेमली होती.









