BJP leader Seema Patra Dispute : झारखंडमध्ये एका माजी आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नीने घरी काम करणाऱ्या आदिवासी महिलेचा छळवाद करत मारहाण केली आहे. य़ात त्या महिलेचे दात पडले असून तिला हालचाल करण्यात अडचण येत आहे. अत्याचार करणाऱ्या महिलेचे नाव सीमा पात्रा असे आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच आज झारखंड पोलिसांनी सीमा पात्राला अटक केली आहे. तिला अटक केली. यावेळी तिने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आपल्यावर झालेले आरोप खोटे आहेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे आरोप आपल्यावर झाले असून यात आपल्याला गोवलं गेल्याचंही पात्रा म्हणाल्या आहेत.
सीमा पात्रा यांनी आपल्या घरी काम करणाऱ्या सुनीता या आदिवासी महिलेला क्रूरपणे मारहाण केली आहे. त्यांनी सुनीता यांना लोखंडी रॉडने मारहाण करत त्यांचे दात तोडले. तसंच त्यांच्या अंगावर गरम सळईने चटके दिल्याचाही आरोप आहे. तसेच महिलेला जिभेने चाटून शौचालय स्वच्छ करण्यास सांगितल्याचाही आरोप आहे. याप्रकाराने भाजपने सीमा पात्राला निलंबित केलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









