Kolhapur : कोल्हापुरातील एका नामवंत महाविद्यालयातील महिला प्राध्यापकाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ बोलल्यानंतर त्यावर अनेक संघटनांनी संताप व्यक्त केला. त्यावर आज गोकुळ शिरगाव मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने कॉलेज प्रशासनाची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं. औरंगजेबाचा समर्थन करणाऱ्या महिला प्राध्यापिकेला निलंबित करावे अशी मागणी, सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली.
औरंगजेब चांगला होता. कुलकर्णी, पाटील देशमुख हे बलात्कारी होते. असे संभाषण असणाऱ्या कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापिकेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओ नंतर समाज माध्यमात त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित महिलेने माफी मागावी अशी मागणी ही काही संघटनांनी केली होती. आज गोकुळ शिरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने कॉलेज प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. संबंधित महिलेला कामावरून निलंबन करून योग्य ती कारवाई करावी. तसेच असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सचिन संकपाळ, महेश यमगेकर, महादेव पाटील स्वरूप पाटील कृष्णा जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









