-पोलिसांकडून कोठडी वाढवून मागण्याची शक्यता
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खूनातील 3 संशयितांना सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आह़े शहर पोलिसांकडून 11 सप्टेंबर रोजी संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होत़ी सोमवारी ही पोलीस कोठडी संपत असल्याने पुन्हा एकदा संशयितांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आह़े यावेळी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून होण्याची शक्यता आह़े
1 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या किचनमध्ये गळा आवळून खून केल़ा तसेच यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल़ा तसेच त्याची राख व हाडे समुद्रात फेकून दिल्याचे समोर आल़े या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (47), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (ऱा सर्व सडामिऱया रत्नागिरी) यांना अटक केल़ी
स्वप्नाली सावंत खून प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्याकडून करण्यात येत आह़े खून प्रकरणात मृतदेह जाळून टाकण्यात आल्याने पोलिसांपुढे तपास काम करताना अडचणींना समोर जावे लागले होत़े दरम्यान आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी तपासामध्ये काय निष्पन्न केले, हे न्यायालयापुढे ठेवावे लागणार आह़े तसेच पोलीस कोठडीत वाढ हवी असल्यास त्याची कारणे पोलिसांना न्यायालयापुढे सांगावी लागणार आहेत़
मागील 8 दिवसांच्या तपासामध्ये पोलिसांना स्वप्नाली सावंत हिचा मृतदेह जाळून टाकल्यानंतर शिल्लक राहिलेली हाडे पोलिसांना आढळून आली होत़ी तसेच घरातील फोडून टाकण्यात आलेला कोबा व गुह्यासाठी वापरण्यात आलेली दोन वाहने पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एका चारचाकी व दुचाकीचा समावेश आह़े या वाहनांचीही फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आह़े
स्कूबा डायव्हिंगच्या मदतीने मोबाईल शोधला
स्वप्नाली सावंत हिचा खून केल्यानंतर तिचा मोबाईल मुख्य आरोपी भाई सावंत याने जवळच्या विहिरीत टाकून दिला होत़ा ही विहीर पोलिसांकडून पंप लावून उपसण्याचे प्रयत्न झाल़े मात्र विहिरीला पाणी जास्त असल्याने पाणी उपसण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्य़ा दरम्यान स्कूबा डायव्हिंगच्या मदतीने विहिरीच्या तळाशी असलेला मोबाईल शोधून काढण्यात आल़ा या मोबाईलच्या माध्यमातून काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आह़े









