कोल्हापूर
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी संशयीत प्रशांत कोरटकर ( रा. नागपूर) याला सत्र व जिल्हा न्यायालयाचे न्यायधीश डी. व्ही. कश्यप यांनी मंगळवारी दुपारी अटकपूर्व जामीनअर्ज ना मंजूर केला.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केलेल्या प्रशांत कोरटकर (रा. नागपूर) या संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्या समोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी संशयित कोरटकरला न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, याकरीता सरकारी वकील विवेक शुल्क आणि फिर्यादी इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तीवाद केला. तर संशयीत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज का मंजूर करावा, याकरीता त्यांचे वकील सौरभ घाग यांनी आपली बाजू मांडली.








