Love Jihad Cases In Kolhapur : कथित लव्ह जिहाद प्रकरणातील संशयित आरोपीला आठ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. अल्ताफ काझी असे या संशयित आरोपीचे नाव आहे. काल रात्री पीडित मुलीला आणि आरोपीला संकेश्वर मधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
फुस लावून पळवून नेलेल्या मंगळवार पेठेतील अल्पवयान मुलीचा १७ दिवसानंतर कर्नाटकात शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याप्रकरणी काल (ता. 2) काही हिंदुत्ववादी संघटनांकडून आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर लव्ह जिहाद विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर अवघ्या १० तासांत तिचा शोध लागला.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- कोल्हापुरात खड्ड्याची फोटो स्पर्धा, चर्चेला उधाण; गुवाहाटी, सुरत, गोव्याचे मिळणार बक्षिस
Previous Articleवनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग व विवेकानंद पर्यावरण संस्थेच्या संकल्पनेतून पक्षी सप्ताह होणार
Next Article कुडासे येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम संपन्न









