ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) मध्यप्रदेशात आल्यानंतर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या गुन्ह्यातील संशयिताला नागदा पोलिसांनी अटक केली आहे. नागदा पोलिसांनी इंदूर गुन्हे शाखेला याबाबत माहिती दिली आहे. मात्र पोलीस अजूनही त्याला संशयित मानत आहेत. हा आरोपी रायबरेलीचा रहिवासी आहे. गुन्हे शाखेने पाठवलेल्या फोटोवरून नागदा पोलिसांनी त्याला पकडले असून पुढील कारवाईसाठी इंदूर गुन्हे शाखेला कळविण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात आल्यावर त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी संशयित आरोपीने दिली होती.
नागदा पोलिस स्टेशनचे प्रभारी श्याम चंद्र शर्मा यांनी सांगितले की, इंदूर गुन्हे शाखेने राहुल गांधींना धमकी देणाऱ्या संशयिताचे छायाचित्र पाठवले होते. फोटोच्या आधारे नागदा पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. नागदा येथील बायपासवरील एका हॉटेलमध्ये असाच दिसणारा एक व्यक्ती असल्याची माहिती गुरुवारी दुपारी दोन वाजता पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले.
दया सिंग असे संशयित आरोपीने नाव आहे. तो शीख आहे. या व्यक्तीकडे आढळलेल्या आधार कार्डावरील पत्ता रायबरेली, उत्तर प्रदेशचा आहे. वॉर्ड क्रमांक २४ येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर इंदूर क्राईम ब्रँचमध्ये ज्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता तेच नाव ही व्यक्ती सांगत आहे. शर्मा यांनी पुढे सांगितले की, ते नागदा येथे आल्यानंतर ते त्याला इंदूर गुन्हे शाखेकडे सोपवतील.
इंदूर क्राईम ब्रँचमध्ये नमूद केल्याप्रमाणेया व्यक्तीचे नाव आहे. नागदा पोलिसांनी इंदूर क्राईम ब्रँचला याबाबत माहिती दिली आहे. आता इंदूर गुन्हे शाखा नागदा येथे येऊन आरोपीची ओळख पटवणार आहेत. उज्जैनचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितले की, इंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एकपत्र सापडले आहे, ज्यामध्ये राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या आधारे इंदूर पोलीस तपास करत आहेत. नागदा पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे, तो मूळचा रायबरेली,उत्तर प्रदेशचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला पकडण्यासाठी इंदूर पोलीस पोहोचत आहेत. पुढील तपासातच या प्रकरणाचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.