पणजी : मुंबईतील बांद्रा रेल्वे पोलिसांना फोन करून चेंबूर पोलिस स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा सांगून पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी कोल्हापुरातील एका 40 वर्षीय इसमाला ताब्यात घेतले आहे. त्याला कोलवाळ येथून ताब्यात घेण्यात आले असल्याने कोलवाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वांद्रे रेल्वे पोलिस त्याला ताब्यात घेतील, अशी माहिती एटीएस पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. संशयित गोव्यात मजूर म्हणून काम करत होता तर कोलवाळ येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याने मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना फोन केला व चेंबूर पोलिस स्थानकावर बॉम्ब ठेवला असून, पोलिस स्थानक उडवून देणार, अशी धमकी होते. त्यामुळे मुंबई पोलिसांची झोप उडाली होती.
मुंबई पोलिसांनी गोवा एटीएसची संपर्क आलेल्या कॉलसंदर्भात माहिती दिल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सदर व्यक्तीने गोवा वेर्णा येथून कॉल केला होता. मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना, चेंबूर पोलिस ठाणे उडवून देऊ, अशी धमकी दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कॉल ट्रेस केला असता गोव्यातून कॉल आल्याचे लक्षात आले. त्यानुसार संध्या. 6.30 च्या सुमारास येथील गोवा पोलिसांशी संपर्क साधला व सदर व्यक्ती शोधण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गोवा पोलिसांनी एटीएसमध्ये कळविल्यानंतर त्यांनी शोध घेतला असता ती व्यक्ती कोळवाळ येथे असल्याचे समजले. त्यानुसार कोलवाळ येथे तांत्रिक पाळत ठेवली आणि रात्री 8 च्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर एटीएस पथकाने संशयिताला कोलवाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर व्यक्ती गोव्यात चार वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहत होता.








