ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्धव ठाकरे यांनी राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय, अशा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेतला. फडतूस नाही, तर काडतूस आहे. झुकेगा नहीं घुसेगा साला, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, फडणवीसांच्या या डायलॉगवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना डिवचलं आहे.
सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “झुकेगा नहां साला हा डायलॉग भारीच होता. पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला 7 वर्ष कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात, हे काय पटत नाही राव.”असा खोचक टोला अंधारे यांनी या ट्विटमधून लगावला आहे.
अधिक वाचा : राऊतांना गांभीर्याने घेण्याचे कारण नाही








