वृत्तसंस्था/ मुंबई
शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने वानखडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमारने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक तर 49 चेंडूत शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या खेळाडूने केलेली ही तिसरा सर्वात मोठी खेळी ठरली आहे. मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी खेळी सनथ जयसूर्या याने केली होती. आयपीएलचा पहिला हंगाम म्हणजेच 2008 साली जयसूर्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध वानखडे स्टेडियमवर नाबाद 114 धावा ठोकल्या होत्या. ही मुंबईसाठी एखाद्या खेळाडूने केलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे. मुंबईसाठी दुसरी सर्वात मोठी खेळी केली ती रोहित शर्माने. 2012 मध्ये रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद 109 धावा कुटल्या होत्या. हा सामना कोलकातामध्येच खेळला गेला होता. यानंतर सूर्यकुमार यादव शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध वादळी खेळी करताना दिसला. त्याने 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 49 चेंडूत नाबाद 103 धावा कुटल्या. मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या खेळाडूकडून केली गेलेली ही तिसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. या यादीत चौथा क्रमांक महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा आहे. सचिनने 2011 साली मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर कोची संघाविरुद्ध नाबाद 100 धावा कुटल्या होत्या.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वोत मोठी खेळी करणारे फलंदाज
114ङ सनथ जयसूर्या वि. सीएसके, (वानखडे स्टेडियम, 2008)
109ङ रोहित शर्मा वि. केकेआर (कोलकाता, 2012)
103ङ सूर्यकुमार यादव वि. गुजरात टायटन्स, (वानखडे स्टेडियम, 2023)
100ङ सचिन तेंडुलकर वि कोची टस्कर्स केरला (मुंबई, वानखडे स्टेडियम)
100ङ लेन्डन सिमन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, (मोहाली, 2014)









