क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
जागतिक योग दिनानिमित्त बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सनातन संस्कृती व योग सेवा संघाच्यावतीने 22 जून योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कटकोळ यांनी दिली. बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
25 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 22 जून रोजी सर्वात मोठी मॅरेथॉन व सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 8 ते 60 वर्ष वयोगटातील सहा गटातून सुमारे 600 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात 24 बक्षीसे दिली जाणार आहेत. सर्वाधिक सूर्यनमस्कार करणाऱ्या विजेत्याला चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी वैभव वेर्णेकर, विश्वनाथ एम. आय. पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









