वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ प्रत्येक वषी विविध क्रिकेटपटूंशी मध्यवर्ती करार करीत असते. आता 2022-23 च्या क्रिकेट हंगामासाठी बीसीसीआयने खेळाडूंशी नवा करार करण्याचे निश्चित केले असून 21 डिसेंबर रोजी होणाऱया मंडळाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये मध्यवर्ती करार करणाऱया खेळाडूंची यादी निश्चित केली जाईल. या यादीमध्ये भारताचे धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांना बढती मिळण्याची शक्मयता असून अजिंक्मय रहाणे व ईशांत शर्मा यांना मध्यवर्ती करार गमवावा लागण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
अष्टपैलू हार्दिक पांडय़ा हा भविष्यकाळातील भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार होण्याची शक्मयता असून मंडळाच्या सध्याच्या मध्यवर्ती करारानुसार तो क गटात आहे. पण आता त्याला ब गटात बढती मिळण्याची शक्मयता आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या कार्यकारिणी समितीच्या होणाऱया बैठकीमध्ये भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी तसेच बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेतील कामगिरीचा आढावा घेतला जाईल. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आयसीसीकडून डकवर्थ लेविस नियमाची अंमलबजावणी केली जाते. त्याच धर्तीवर आता राष्ट्रीय क्रिकेट स्तरावर व्ही. जयदेवन नियमांची अंमलबजावणी केली जाणार असून विजय हजारे करंडक तसेच देवधर करंडक, मुश्ताक अली आणि चॅलेंजर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत या नियमांचा वापर केला जाईल.
मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या अटीमध्ये यावेळी बदल केला जाणार असून पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मध्यवर्ती करार उपलब्ध राहील. भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्मय रहाणे तसेच वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांचा मात्र मध्यवर्ती करारासाठी विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धीमान साहा यालाही या नव्या यादीतून वगळण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाशी मध्यवर्ती करार करणाऱया क्रिकेटपटूंमध्ये चार गट राहतील. ए प्लस गटातील क्रिकेटपटूला या मध्यवर्ती कराराकरिता 7 कोटी रुपये, ए गटातील क्रिकेटपटूला 5 कोटी, बी गटातील क्रिकेटपटूला 3 कोटी, तर क गटातील क्रिकेटपटूला 1 कोटी रुपये मिळतील. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव याची अलीकडच्या विविध स्पर्धातील कामगिरी दर्जेदार झाली असल्याने त्याला बढती मिळण्याची शक्मयता आहे. सध्या तो क गटात असून त्याला नव्या करारामध्ये ब गटात स्थान मिळेल, असे वाटते. सूर्यकुमार यादव हा आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत अग्रस्थानावर आहे. शुभमन गिल हा कसोटी आणि वनडे प्रकारात खेळत आहे. त्यालाही क गटातून ब गटात बढती दिली जाईल. अलीकडेच वनडे सामन्यात द्विशतक झळकविणाऱया ईशान किसनलाही मध्यवर्ती करारात बढती मिळण्याची शक्मयता आहे. हार्दिक पांडय़ाला ब गटात स्थान मिळू शकेल. गेल्या वषी त्याचा क गटात समावेश होता. आगामी नव्या वर्षामध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारतात वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे. भारताचा माजी कसोटीवीर अशोक मल्होत्रा याची क्रिकेट सल्लागार समितीच्या प्रमुखपदी यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे नवे बदल केले जातील.