वार्ताहर /सावईवेरे
सावईवेरे येथील समर्थ पालक शिक्षक संघ व शारदोत्सव समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी शारदोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुर्यकांत नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडण्यात आलेली समिती पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष वासंती नाईक, सचिव गीतेश वेरेकर, सहसचिव सदानंद नाईक, खजिनदार चंद्रजीत च्यारी, सहखजिनदार वैभव वेरेकर तर सभासद म्हणून संदेश सावईकर, अक्षय नाईक, प्रेमा शेट वेरेकर, नरेश च्यारी, अजय नाईक, समीर शेट वेरेकर, जयंत नाईक, मीना राऊत, नारायण बांदीग्रे, शैलेश च्यारी व रेखा च्यारी यांची निवड करण्यात आली. सदानंद नाईक यांनी स्वागत केले. मागील वर्षाचा जमाखर्च सादर केला. यानंतर 2 ऑक्टो. ते 6 ऑक्टो. पर्यंत पाच दिवशीय शारदोत्सव साजरा करण्याचे निश्चित झाले.









