अस्वस्थ बांगलादेशवर थेट नजर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशात मागील आठवड्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर अद्याप अस्थिरतेची स्थिती आहे. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले अन् अत्याचार होत असल्याने याची धग आता भारतालाही जाणवू लागली आहे. बांगलादेशातील हिंसेपासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तेथील हिंदू आता भारतात दाखल होऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर बीएसएफने सीमेवरील दक्षता वाढविली आहे. बांगलादेशातून घुसखोरी होऊ नये म्हणून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. याचदरम्यान केंद्र सरकारने बांगलादेश सीमेवर खास विमान तैनात केले आहे. याचे नाव ग्लोबल 5000 स्पेशल मिशन एअरक्राफ्ट आहे. याचा वापर आरअँडएडब्ल्यू (रॉ) कडून केला जातो. हे विमान सिग्नल इंटेलिजेन्स जमा करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. तसेच यात खास प्रकारच्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर अँड रीकॉन्सेंस सुईटचा अंतर्भाव आहे.
बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या विरोधात होत असलेल्या हिंसेमुळे सीमेवर अशाप्रकारच्या विमानाची तैनात करणे आवश्यक ठरले होते. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना स्वत:चा देश सोडत भारतात आश्रय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशात कट्टरवाद्यांकडून आता हिंदूधर्मीयांना लक्ष्य करण्यात येत आहे.
बांगलादेशातील स्थितीवर नजर ठेवण्यासाठी हे विमान सीमेवर तैनात करण्यात आले आहे. हे विमान प्रत्यक्षात बॉम्बार्डियर ग्लोबल 5000 बिझनेस जेटचे मॉडिफाइड वर्जन आहे. म्हणजेच यात अनेक प्रकारच डाटा जमविण्यासाठी उपकरणे बसविण्यात आली आहेत. खासकरून इंटेलिजेन्स डाटा जमविण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो.
बांगलादेशावर आकाशातून थेट देखरेख
या विमानात ईएल/आय-3001 एअरबॉर्न इंटीग्रेटेड सिग्नल इंटेलिजेन्स सिस्टीम लावण्यात आली आहे. ही सिस्टीम इस्रायलने विकसित केली आहे. हे कुठल्याही प्रकारच्या सिग्नलला ट्रॅक करू शकते. भले मग ते इलेक्ट्रॉनिक सिग्नल असो किंवा कम्युनिकेशनसाठी वापरण्यात येणारे सिग्नल असो, ते ट्रॅक करण्याची किमया या सिस्टीमकडून केली जाते. म्हणजेच बांगलादेशच्या सीमेवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या संचारावर भारताची नजर असणार आहे. हे विमान कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक किंवा कम्युनिकेशन किंवा रडारवरून निघणाऱ्या सिग्नलला इंटरसेप्ट करू शकते. भारत आता या विमानाच्या मदतीने बागंलादेशात सद्यकाळात होत असलेल्या सर्वप्रकारच्या संचाराला ट्रॅक करू शकणार आहे. यातून गरजेच्या प्रसंगी रणनीति आखण्यास यामुळे मदत होणार आहे.
हाय-रिझोल्युशन छायाचित्रे मिळणार
या विमानात रेसेलाइट रीकॉन्सेंस पॉड लावण्यात आला असून तो हाय-रिझोल्युशन छायाचित्रे काढू शकतो. याचबरोबर अनेक अन्य प्रकारच्या इंटेलिजेन्स संबंधित छायाचित्रे मिळवू शकतो. भारताकडे सध्या अशी दोन विमाने असून ती दिल्लीच्या पालम वायुतळावर तैनात असतात. यातील एक विमान दिल्लीहून लखनौ-पाटनामार्गे आता बांगलादेशच्या सीमेपर्यंत पोहोचले आहे.
विमानाचे तांत्रिक वैशिष्ट्या
या विमानात उपकरणे जोडलेली नसल्यास 16 जण प्रवास करू शकतात. 96.10 फूट लांब विमानाचा विंगस्पॅन 94 फूटांचा आहे. यात 17,804 किलोग्रॅम इंधन सामावू शकते. हे विमान 934 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उ•ाण करत देखरेख ठेवू शकते. याची उ•ाणकक्षा 9630 किलोमीटर इतकी मोठी आहे. या विमानाला लँडिंगसाठी केवळ 673 मीटरची धावपट्टी पुरेशी आहे. या विमानात दोन वैज्ञानिकांकडून संचालन केले जाते, तर हे विमान कमाल 51 हजार फुटांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकते.









