झारखंड पोलिसांच्या प्रयत्नांना यश
वृत्तसंस्था/ रांची
नक्षलवादी संघटनेचा झोनल कमांडर अन् 10 लाख रुपयांचे इनाम असलेले अमरजीत यादव उर्फ लखन यादवसमवेत 5 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण पेले आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये पोलीस महानिरीक्षक अमोल होमकर आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसमोर या नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रs खाली ठेवली आहेत. या नक्षलवाद्यांवर झारखंड अन् बिहारमध्ये एकूण 223 गुन्हे नोंद होते. झोनल कमांडर अमरजीत यादव याच्यावरच एकूण 81 गुन्हे आहेत.
या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने झारखंडमध्ये बूढा पहाड, झुमरा अन् पारसनाथनंतर आता कौलेश्वरी भाग देखील नक्षलमुक्त झाला आहे. अलिकडेच झालेल्या चकमकीत 5 नक्षलवादी मारले गेले होते. तर नक्षलवादी संघटनेचा वरिष्ठ सदस्य इंदल गंझूने अलिकडेच आत्मसमर्पण केले होते. या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करताना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs पोलिसांना सोपविली आहेत. यात एके 56 रायफल, एसएलआर, इंसास रायफल, मार्क राययल, 30 एमएम यूएस रायफल, पिस्तुल इत्यादींचा समावेश आहे.









