नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात शनिवारी मणक्मयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अमरिंदर सिंग यांच्यासमवेत सध्या नातलग प्रेणी कौर उपस्थित आहेत. त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली. अमरिंदर सिंग यांना रविवारपासून रुग्णालयातील एका स्वतंत्र खोलीत हलवण्यात आले असून सोमवारी डिस्चार्ज मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरिंदर सिंग यांच्याशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.









