सांगली / संजय गायकवाड :
सांगली मिरज आणि सांगली माधवनगर रा रस्त्यांना जोडणाऱ्या सांगलीतील आमराई आणि आझाद चौकात वाहन चोरटे, खड्डे आणि मोकाट कुत्र्यांच्या झुंडीमुळे या चौकातून ये जा करणाऱ्या वाहनचालकांचा कधी अपघात होईल याचा नेम नाही. आमराई चौकातील एक समस्या संपली की दूसरी अशा विचित्र समस्यांच्या गर्तेत हा चौक नेहमीच सापडला आहे. महापालिका प्रशासनातील अनेक अधिकारी या रस्त्यावरून रोज ये जा करतात. पण या चौकाच्या सुधारणेकडे पालिकेने कधीही गांर्मीयांने पाहिले नाही.
सांगलीतील आमराई आणि आझाद चौक हे दोन चौक एकमेकांना पुरक आणि अगदी जवळ असणारे चौक आहेत. दोन्ही चौकातील नागरी समस्या वेगवेगळ्या आणि कायम आहेत. स्टेशन चौकातून विश्रामबाग, विजयनगर, कुपवाड आणि मिरजेकडे जाणारी सर्व वाहने आझाद चौकातून पुढे जात असतात. या चौकानजिक एका बाजूला महाापलिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम, कोपऱ्यात असंख्य व्यापारी संकुले, हॉटेल्स, चहाची दुकाने, मेडिकल्स यांची रेलचेल आहे. तर यान चौकातून एक रस्ता आमराईपासून पुढे वखारभागाकडे व दुसरा रस्ता कॉलेज कॉर्नरकडे जातो. याच रोडने माधवनगर, तासगाव, विटा, आटपाडी या भागाकडे जाता येते. त्यामुळे या दोन्ही चौकातून ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
आझाद चौकातून आमराईकडे जाताना पान सहा महिन्यापुर्वी छत्रपती शिवाजी स्टेडीयमन्या कोपऱ्यावर हॉटेल ककूनसमोर ड्रेनेजची एक मोठी पाईपलाईन फुटून येथे सांडपाणी साचत होते. मनपाने येथे दोन महिन्यापुर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण केले. पण हे काम पूर्ण करताना जे पेंनवर्क करण्यात आले ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. त्यामुळे आझाद चौकातून आमराईकडे जाताना व तिकडून आझाद चौकाकडे येताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. येबील रस्ता नांगला केलेला नाही.
आझाद चौकात वाहतुक नियंत्रणासाठी ट्रैफिक सिग्नल बसविले आहेत. पण हे सिग्नल कधी सुरू तर कधी बंद असतात. आमराई चौकातील समस्यांची जंत्री मोठी आहे. पुर्वी आमराईत फिरायला व व्यायामासाठी येणाऱ्या लोकांच्या दुचाकी आतमध्ये लावल्या जात होत्या. पण मनपा प्रशासनाने आतमध्ये लावली जाणारी सर्व वाहने आमराईच्या गेटसमोर लावण्याचे आदेश काढले. त्यामुळे गेटसमोर दिवसभर बाहनांची मोठी गर्दी होवू लागली आहे. बाजूलाच रिक्षा स्टॉप आणि कोपऱ्यातील सांगली हायस्कूल, समोरच शिवाजी स्टेडीयम आणि पाठीमागे जेठाभाईवाडी यामुळे आमराई चौकात दिवसभर मोठी गर्दी असते. गेटसमोर वाढत्या वाहनांच्या संख्येचा गैरफायदा घेत चोरटयांनी येथे हात मारण्यास सुरूवात केली आहे. आमराई गेटसमोरून गेल्या वर्षभरात अनेक मोटरसायकली चोरीस गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.
शहरातील अन्य भागाप्रमाणेच आमराई चौकातही मोकाट कुत्री आणि भटकी जनावरे यांची समस्या कायम आहे. आमराई चौकात पुर्वी सिटी बसचा स्टॉप होता. आता सिटी बसेसची संख्याही कमी झाली आणि येथील पोलीस चौकी पाडल्यानंतर येथील बसस्टॉपही गायब झाला. त्यामुळे येथे विद्यार्थी व प्रवाशांना उन्ह पावसातच उभे रहावे लागते.
आमराईच्या कोपऱ्यात एक स्वच्छतागृह आहे त्याची कधी तर स्वच्छता केली जाते. येथे रात्री अनेकजण उघड्यावरच लघुशंका करत असतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. स्टेडीयमच्या आतमध्ये साचून राहणारे पावसाचे पाणी आमराई नौकात बाहेर येते. येथे स्टेडीयमनी एका बाजूच्या भिंतीना कोपरा ढासळलेला आहे. तो दुरूस्त करण्यासाठी महापालिकेला वेळ नाही.
- आमराई चौकाचे सुशोभिकरण आवश्यक
सांगली शहरातील हॉर्ट ऑफ सिटी म्हणून गणना होणाऱ्या आमराई चौकाच्या सुशोभिकरणासाठी मनपा आयुक्त सत्यम गांधी यानी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आमराईत आतमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी आहेत. पण गेटसमोर मात्र दुरावस्था झाली आहे. आमराई ते आझाद चौक रस्ता नांगला करण्याबरोबरन येथील खड्डे मुजविण्याची तसेच येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
– सतिश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते सांगली.








